Friday, 6 November 2009


शिवगर्जनाला या वर्षी ९ वर्ष पूर्ण झाली आणि पथक आता लवकरच १० वर्ष पूर्णा करणार आहे . तरीही आज अनेक लोकाना पथकाच्या इतिहासाबद्द्ल माहिती नाही . अनेक मुले / मुली दरवर्षी पथकामधे येतात पण त्यानाही हे माहिती नाही की पथक चालू कसे झाले.
या ब्लॉगच्या आधारे ती माहिती सादर करण्याचा मी एक प्रयत्‍न करत आहे.......




२००१चे गणपती झाल्यावर काही कारणांन मुळे नु म वि शाळेने पथक बंद करायचा निर्णय घेतला. त्यामुळे नंतर साधारण वर्षभर हीच चर्चा होती की अरे आता पुढे काय,पुढच्य वर्षी आपण कुठे जायचे. पथकांमधील सर्व सीनियर शाळे बरोबर चर्चा करून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्‍न करत होते. तरीही शाळेचा सूर काही बदलायला तयार नव्हता. २००२च्या जून महिना अखेरीस शाळेने अखेर नकार कळवल्यानंतर "आता पथक बंद होणार.."या निराशे मधे सर्व होते.

पण अतुल बेहरे,राजहंस मेहनदळे(jonny),केदार कानिटकर,सत्यजीत शिंदे,वामन परांजपे,नाना पोरे...यांच्या काही वेगळ्याच कल्पना होत्या. पथक हे नुसते ढोल ताशे वाजवण्या पुरते मर्यादित नसून ती आपली एक परंपरा आहे,ती आपली संस्कृती आहे आणि ती आपण काही झाले तरी जपायलाच पाहिजे यावर सर्व ठाम होते. २००२च्या जुलाइ महिन्या मधे शाळे बाहेरील मीटिंगला वेग आला आणि सर्वांचा निर्णय झाला आपण आपले वेगळे पथक काढायचे.


आता वेळ थोडा होता आणि कामे खूप होती. कारण नवीन पथक सुरू करायचे म्हणजे परत शून्यातून विश्वा निर्माण करण्यासारखे होते. ऑगस्ट महिन्या मधे सर्वानी पूर्णपणे झोकून कामाला सुरवात केली. पथकला त्यावेळी सर्वात मोठी अडचण होती ती पैसे कसे उभे करायची याची. आशा वेळी पथकामधल्या अनेकानी आपल्या जवळचे आणि आपल्याला शक्य होतील तेवढे पैसे दिले. अनेकानी आपल्या घरच्यान बरोबर भांडून आपल्याला जमेल ती मदत केली.

हा सर्व प्रॉब्लेम सुटल्यावर मग पथक स्थापन करण्याचा दिवस ठरला. ऑगस्ट २००२ च्या गोकुळ अष्टमीचा दिवस पथक स्थापणे साठी ठरला. दिवस ठरला असला तरी अजुन नाव काया ते ठरले नव्हते. सर्वचजन वेगवेगळी नावे सुचवत होते.आशतच पथकामधील जेष्टा पराग ठाकूर यानी नाव सुचवले "शिवगर्जना". नाव घेताच क्षणी ते सर्वाना आवडले. जोशपूर्ण आशा ढोल तशाच्या कालाप्रकाराला जोशपूर्ण आसेच नाव मिळाले....


आणि ऑगस्ट २००२ च्या गोकुळ अष्टमीला आखेर पथक सुरू झाले. सुरवातीला ७० संख्या असलेल्या या परिवारा मधे अनेक लोक मिळत गेले. यशाची एक एक पायरी चढत चढत पथक गेली अनेक वर्ष यशाच्य शिखरावर आहे. यशाने हुरळून न जाता पथक दरवर्षी काही ना काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असते.

पथकला अग्रेसर ठेवण्यामधे अनेकांचा मोलाचा वाटा आहे आणि या पुढे ही एकदिलाने संघटित राहून सर्वज्ञन पथकला अग्रेसर ठेवतील याची आम्हाला खात्री आहे.....

6 comments:

  1. chaaan... kharach hey saglyanna mahit nahiye.. thnx a lot... hi mahiti amchyaparyanta pohochvnyasathi... :)

    ReplyDelete
  2. Sahi ... actually everyone should know the background of such a great job It's great team work ............ Thank a lot for giving a valuable information.

    ReplyDelete
  3. Danny...... Great Job Yaar...... Too good.... chaan waatla shivagarjana badaal wachalyavar.... keep up the good work....

    ReplyDelete
  4. danny lai bhari lihilay
    parat ekda te june diwas athawle
    saglya kadu god athwani jagya zalya

    ReplyDelete
  5. lai bhari dannnny!!!!!!!asach lihit raha..............

    ReplyDelete