Monday, 26 October 2009


शिवगर्जना...

शिवगर्जना हे नाव तस साधाच पण ज्या लोकना ढोल,तशाची आवड आहे त्यांच्या साठी हे नाव काही नवीन नाही ...
पावसाळा सुरू झाला की सर्वाना चाहूल लागते ती प्रॅक्टीसची. पथकामधला कोणी एखादा सीनियर भेटला की त्याला " अरे प्रॅक्टीस कधी चालू होणार..","कुठे आहे.."आशी विचारपूस चालू होते. मीटिंग ठरवल्या जातात,प्रॅक्टीसची तारीख ठरते,मग फोनफोनी चालू होते. मागच्या वेळी काय केला या वेळी काय काय करायचे याच्या चर्चा रंगतात...म्हणजे पूर्णपणे वातावरण निर्मिती झालेली असते.

गणपती बाप्पा मोरया म्हणत प्रॅक्टीस जोरदारपणे चालू होते. मानणीया अध्यक्ष परांजपे सर च्या आदेशा वरुन आणि अतुल बेहारें च्या देखरेखीमधे प्रॅक्टीस रंगत जाते. नवीन मुले,मुली यांचाच बरोबर जेव्हा जुन्या लोकांची प्रॅक्टीस चालू होते तेव्हा खरी प्रॅक्टीस खुलते ...

प्रॅक्टीस नंतर मीटिंग च्य वेळी शिट्या,टाळ्या..असे थोडे हसवे,थोडे रूसवे क्षण घेत घेत प्रॅक्टीस संपत येते आणि वेळ येते मिरवणुकांची.

नेहमी प्रमाणेच सर्वा मिरवणुका जोरदार होतत. शिवगर्जानाच्या आवाजामुळे आपले नाव नेहमी प्रमाणे सर्वत्र सर्वांच्या आधी घेतले जाते. सर्व मिरवणुका जोरदरपणे वाजवत पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणरायाला निरोप दिला जातो...
प्रॅक्टीस,मिरवणुका या सर्वांमधे महिना असा पटकन निघून जातो की काही कळतच नाही. नंतर इतकी भयाण शांतात येते की बस..
पण सर्व आठवणींची शिदोरी घेऊन,झालेल्या प्रॅक्टीस,मिरवणुकन बद्दल चर्चा करत काही दिवस जातात आणि आम्ही परत तयारीला लागतो ते GET-TO-GETHER च्या....

3 comments:

  1. awesome writing man...........kharach agdi asach feeling asta........masta lihilays danny....

    ReplyDelete
  2. 1 no. ahe re
    kharach saglyanchya manat asach asta re

    ReplyDelete