आपल्या मनातील भावना जेव्हा शब्द रुपाने बाहेर पाडतात तेव्हा निर्मान होते ती कविता...
कविता हा माझ्या कायमच जिव्हाळ्याचा भाग राहीला आहे.
हा ब्लॉग माझा एक प्रयत्न आहे आवड्लेल्या कवितांना सादर करण्याचा ...
यातील कविता Orkut/Blog/
मी साठवलेल्या आहेत.
त्या आपल्या समोर सादर करत आहे .....
‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा!
कवी - कुसुमाग्रज
दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,
खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे
परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता ||
खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली ||
नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !"
समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा ||
कवी - कुसुमाग्रज
दु:
ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही,
ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें,
मी न माझा आरसा.
एकला मी नाहि जैसा,
नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा,
मी न माझा पाहुणा.
प्रश्न की उद्गार नाही,
अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही,
पैल,
तैसा मध्य ना.
याद नाही,
साद नाही,
ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.
सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवानाव आहे चाललेली,
दूरची हाले हवा.
दु:
ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
पाउस कधीचा पडतोझाडांचि हलति पानेहलकेच जाग मज आलीदु:
खाच्या मंद सुरानेडोळ्यत ऊतरले पाणीपाण्यावर डोळे फिरतीरक्ताचा उडाला पाराया नितळ उतरणीवरतीपेटून कशी उजळेनहि शुभ्र फुलांचि ज्वालातार्
यांच्या प्रहरापशीपाउस असा कोसळलासन्दिग्ध घरांच्या ओळीआकाश ढवळतो वारामाझ्याच किनार्
यवरतीलाटंचा आज पहारा सांग मला रे सांग मलासांग मला रे सांग मलाआई आणखी बाबा यातुन,
कोण आवडे अधिक तुला ?
आई दिसते गोजिरवाणी,
आई गाते सुंदर गाणीतऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती,
बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !
गोजिरवाणी दिसते आई,
परंतु भित्री भागुबाईशक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !
घरात करते खाऊ आई,
घरातल्याला गंमत नाहीचिंगम अन्
चॉकलेट तर,
बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !
कुशीत घेता रात्री आई थंडी,
वारा लागत नाहीमऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !
निजता संगे बाबांजवळी भुते-
राक्षसे पळती सगळीमिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !
आई सुंदर कपडे शिवते,
पावडर,
तिटी तीच लावतेतीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !
त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणतीकुणी न देती पैसा-
दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !
बाई म्हणती माय पुजावी,
माणुस ती ना असते देवीरोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !
बाबांचा क्रम वरती राही,
त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !
धडा शीक रे तू बैलोबा,
आईहुनही मोठ्ठे बाबाम्हणून आया तयार होती,
बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !
एका तळ्यातएका तळ्यात होती बदले पिले सुरेखहोते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥कोणी न त्यास घेई खेळावयास संगेसर्वाहूनि निराळे ते वेगळे तरंगेदावूनि बोट त्याला म्हणती हसून लोकआहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥पिल्लस दु:
ख भारी भोळे रडे स्वत:
शीभावंड ना विचारी सांगेल ते कुणाशीजे ते तयास टोची दावी उगाच धाकहोते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥एकेदिनी परंतु पिल्लास त्या कळालेभय वेड पार त्याचे वार्
यासवे पळालेपाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैकत्याचेच त्या कळाले तो राजहंस एक सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !!
तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजनतीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणेसकाळपासुन रात्रीपर्यंततेच ते तेच तेखानावळीही बदलून पाहिल्याकारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हालनरम मसाला,
गरम मसाला,
तोच तो भाजीपालातीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सारसुख थोडे दु:
ख फारसंसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळेत्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फारपडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक,
बुळा बोधनऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंगपुन्हा पुन्हा तेच भोगआसक्तीचा तोच रोगतेच '
मंदिर '
तीच '
मूर्ती '
तीच '
फुले '
तीच '
स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळेतेच मुरके तेच चाळेतोच पलंग तीच नारीसतार नव्हे एकतारीकरीन म्हटले आत्महत्त्यारोमिओची आत्महत्त्यादधीचिची आत्महत्त्याआत्महत्त्याही तीच तीआत्मा ही तोच तोहत्त्याही तीच तीकारण जीवनही तेच तेआणि मरणही तेच ते ने मजसी ने परत मातृभूमीला,
सागरा,
प्राण तळमळलाभूमातेच्या चरणतला तुज धूता,
मी नित्य पाहीला होतामज वदलासी अन्य देशी चल जाऊ,
सृष्टिची विविधता पाहूतइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले,
परि तुवां वचन तिज दिधलेमार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन,
त्वरि तया परत आणीनविश्र्वसलो या तव वचनी मी,
जगद्नुभवयोगे बनुनी मीतव अधिक शक्त उद्धरणी मी,
येईन त्वरे,
कथुन सोडीले तिजलासागरा,
प्राण तळमळला ...
शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी,
ही फसगत झाली तैसीभूविरह कसा सतत साहू या पुढती,
दश दिशा तमोमय होतीगुणसुमने मी वेचियली या भावे,
की तिने सुगंधा घ्यावेजरि उद्धरणी,
व्यय न तिच्या हो साचा,
हा व्यर्थ भार विद्येचाती आम्रवृक्षवत्सलता रे,
नवकुसुमयुता त्या सुलता रेतो बाल गुलाब ही आता रे,
फुलबाग मला,
हाय,
पारखा झालासागरा,
प्राण तळमळला ...
नभि नक्षत्रे बहुत,
एक परी प्यारा मज भरत भूमिचा ताराप्रसाद इथे भव्य,
परी मज भारी आईची झोपडी प्यारीतिजवीण नको राज्य,
मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचाभुलविणे व्यर्थ हे आता रे,
बहुजिवलग गमते चित्ता रेतुज सरित्पते जी सरिता रे,
तद्विरहाची शपथ घालितो तुजलासागरा,
प्राण तळमळला ...
या फेनमिषें हससि निर्दया कैसा,
का वचन भंगिसी ऐसात्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते,
भिऊनि का आंग्ल भूमी तेमन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी,
मज विवासना ते देतीतरि आंग्लभूमि भयभीता रे,
अबला न माझी ही माता रेकथिल हे अगस्तिस आता रे,
जो आचमनी एक क्षणी तुज प्यालासागरा,
प्राण तळमळला ...
अशी ही दोन फुलांची कथाअशी ही दोन फुलांची कथाएक शिवाच्या पदी शोभते । एक शवाच्या माथा ॥इथला निर्माल्यही सुगंधी,
तिथली माळहि कुणी न हुंगीइथे भक्तिचा वास फुलांना,
तेथे नरकव्यथा ॥जन्म जरी एकाच वेलिवर,
भाग्यामध्ये महान अंतरगूळखोबरे कुणा,
कुणाला मिळे पिंड पालथा ॥दोन फुलांचे एकच प्राक्तन,
उच्च नीच हा भास पुरातनएक शिळेला देव मानिते । एक पूजिते म्रॄता ॥निर्माल्य कुणी मंदिरातला,
अर्पियला गंगामाईलाजरा पलिकडे,
स्मशानातला,
पाचोळाही वाहत आलाफुलाफुलांची ओळख पटली । हसला जगन्नियंता ॥ तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही,
तुला बोलावता पोचायचा पाऊसही
पडे ना पापणी पाहून ओलेती तुला,
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही
तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला,
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही
मला पाहून ओला विरघळे रूसवा तुझा,
कशा युक्त्या मला शिकवायचा पाऊसही
कशी भर पावसातही आग माझी व्हायची,
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही
आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा,
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही
कवी - संदीप खरे.
हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दु:खी नव्हतो ऐसे नाही
हसलो म्हणजे फक्त स्वत:च्या फजितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वत:च टाळी;
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही.
हसतो कारण तुच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहरयाला काही शोभत नाही;
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही.
हसतो कारण दुसऱ्यानाही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते 'खरे' वाटते;
हसलो म्हणजे फक्त दाखवली फुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही.
हसतो कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे;
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.
कवी - संदीप खरे
त्याला पाऊस आवडत नाही,
तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.
पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडीपाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतंपावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतंपाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडतेपावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.
आठवण...
आठवण माझी कधीतरी येईलच तुलातु कदाचीत रडशीलहीहात तुझे जुळवुन ठेव तुसगळी आसवं तुझी त्यात सामावतीलजो थांबला तुझ्या हातावरनीट बघ त्याच्याकडेएकटाच राहीलेला तो थेंब मीच असेलमाझ्या आठवणी एखदयालासांगताना तु कदाचीत हसशीलहीजो थांबेल तुझ्या ओठावर येता-
येतानीट वापर त्यालाअडखळलेला तो शब्द मीच असेलकधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्रालात्याच्या तेजाला तु निखरत राहशीलमध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलंनीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेलकधी जर सुटला बेधुंद गार वारामोहक डोळे तुझे मिटुन तु घेशीलमध्येच स्पर्शली तुलाजर उबदार प्रेमळ झुळुकनीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल